रोटरी ने ग्राम परिवर्तनासाठी कार्य करावे – प्रांतपाल स्वाती हेरकल
अहमदपूर (गोविंद काळे) : रोटरी ही जगभर विविध क्षेत्रात कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे . पोलिओ निर्मूलन, शिक्षण क्षेत्र ,आरोग्य क्षेत्र व पर्यावरण या क्षेत्रात रोटरीने आतापर्यंत खूप चांगले कार्य केले . मात्र आता यापुढे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील गावागावांमध्ये जाऊन ग्राम परिवर्तनासाठी कार्य करण्याची गरज आहे असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या प्रथम महिला प्रांतपाल स्वाती हेरकल मॅडम यांनी अहमदपूर येथील रोटरी क्लब ला भेट दिली . याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले रोटरी पर्यावरण, सेंद्रिय शेती, कुपोषण, बाल आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे . यापुढेही रोटरीने सामाजिक भाव जपत शहराबरोबरच ग्रामीण क्षेत्रात पुढाकार घेऊन कार्य केले पाहिजे व परिवर्तन ग्राम ही चळवळ निर्माण केली पाहिजे असे अहमदपूर येथील संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रांतपाल स्वाती हरकल यांनी सांगितले. यावेळी मंचावर सहाय्यक प्रांतपाल विशाल जैन ,अध्यक्ष शिवशंकर पाटील ,सचिव श्रीराम कलमे, हे उपस्थित होते.या कार्यक्रमात खंडाळी येथे नव्याने स्थापन झालेल्या रोटरी कम्युनिटी कॉप च्या नूतन सदस्यांचा व क्लबच्या नूतन महिला सदस्य संगीता खंडागळे, डॉ अंजली उगीले, अश्वीनी कलमे, रिया घाटोळ, वृषाली चवळे, वर्षाराणी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष शिवशंकर पाटील यांनी केले पाहुण्यांचा परिचय ज्ञानोबा भोसले सर तर सूत्रसंचालन कपिल बिरादार व आभार अनिल चवळे यांनी मानले .या कार्यक्रमास माजी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे . सुधीर लातूरे, महानंदा सोनटक्के, मंगला विश्वनाथे, सरस्वती चौधरी यांच्यासह महेंद्र खंडागळे, मोहिब कादरी, नरसिंग चिलकावर ,डॉ चंद्रकांत उगाले, महारुद्र सांगवे , डॉ.निलेश मजगे, गोपाळ पटेल ,नजीप पठाण, बालाजी पटवारी, पांडुरंग पाटील ,श्रीधर लोहारे, माधव वलसे भरत ईगे संतोष मद्देवाड,सचिन करकनाळे, आशिष हेंगणे, डॉ.नंदकुमार गुणाले, डॉ शिवप्रकाश निजवंते, डॉ हिंगणे ,मनोज आरदवाड ,राहुल घाटोळ, रवी कुमार पुणे यांच्यासह रोटरीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते