अहमदपूर येथे राज्य स्तरीय धम्म परिषद

0

अहमदपूर (गोविंद काळे) : 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून समाज बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यानंतर बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी धम्म परिषदांचे आयोजन करण्यात येते. यातून बुद्धांनी सांगितलेल्या त्रिशरण,पंचशील आणि अष्टांगीक मार्ग यांच्या आचरणाने जिवन कसे जगावे हे बौद्ध भंते आपल्या धम्मदेसनेतुन (प्रवचन) उपदेश देतात. त्याच अनुषंगाने बौद्ध धर्म सर्व सामान्यांना कळावा म्हणून अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राज्य स्तरीय दुसरी धम्म परिषद आयोजीत करण्यात आली आहे. या धम परिषदेसाठी श्रीलंका येथुन बौद्ध भिक्खु भंते सुगतवंश , भंते ज्योती थेरो दिल्लीहुन , भन्ते ज्ञानज्योति महाथेरो चंद्रपुर , भन्ते खेमधम्मो महाथेरो मुळावा , भन्ते पंय्यातीस महाथेरो सिरसाळा, भंते विनयपाल महाथेरो शेगाव, भन्ते मुदितानंद थेरो परभणी , भन्ते पय्यानंद थेरो लातूर , भन्ते नागसेन बोधी उदगीर, भन्ते धम्मसार – किल्लारी या सर्वांची धम्मोपदेश देण्यासाठी उपस्थिती राहणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून लातूर लोकसभेचे खासदार मा. सुधाकरजी शृंगारे यांची उपस्थिती राहणार आहे.

धम्म परिषदेस सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे. सकाळी 10 ते 12 पर्यंत जिल्हातील शाहिरांचा बुद्ध भिम गीतांचा प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम होईल. 12.30 ते 3.30 वाजेपर्यंत आदरणीय भंतेजी धम्मदेसना ( धम्मोपदेश ) देतील , नंतर 5 वाजेपर्यंत उपस्थित उपासक उपासिकांसाठी भोजनाची व्यवस्था आणि साजन बेंद्रे ,विशाल चव्हान , साधना मेश्राम, राणी तबस्सुम या ख्यातनाम गायकांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . 5 ते 6 प्रमुख अतिथींचा सन्मान व जाहिर सभा आणि नंतर गायनाचा कार्यक्रम १० वाजेपर्यंत सुरू राहील व १० वाजता कार्यक्रमाची सांगता होईल. या धम्म परिषदेच्या संयोजन समिती व अध्यक्षीय मंडळातील बाबासाहेब कांबळे ,संजय कांबळे , श्रीकांत बनसोडे, लक्ष्मीकांत बनसाडे, प्रा. बालाजी आचार्य , उत्तम कांबळे, प्रकाश ससाने, भगवान ससाने , विनय ढवळे ,त्रिशरण मोहगावकर यांनी मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!