माजी सैनिक राजेंद्र निवृत्तीराव रेड्डी यांचे दुःखद निधन
अहमदपूर : विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय निवृत्तीराव रेड्डी यांचे चिरंजीव, माजी सैनिक राजेंद्र निवृत्तीराव रेड्डी यांचे किडनीच्या दीर्घ आजाराने वयाच्या 83 व्या वर्षी दि.22 रोजी शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलात दुःखद निधन झाले. माजी सैनिक राजेंद्र रेड्डी हे भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांनी कश्मीर, लडाख, लखनऊ आणि कारगिलच्या युद्धामध्ये ही त्यांचा सहभाग होता.भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बीड येथे एस टी आगारात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्यावर दि. 22 रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या फार्म हाऊस वर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात तीन भाऊ, एक मुलगा, दोन मुली,पुतने, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी उर्फ अजित रेड्डी यांचे ते वडील होत. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
