माफसुचे विस्तार शिक्षण संचालक, उदगीरच्या सुपुत्र डॉ अनिल भिकाने जम्मु येथे फेलो अवार्डने सन्मानित

0
माफसुचे विस्तार शिक्षण संचालक, उदगीरच्या सुपुत्र डॉ अनिल भिकाने जम्मु येथे फेलो अवार्डने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्‌यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक प्रा डॉ अनिल उद्धवराव भिकाने याना नुकतेच जम्मु येथे व्ही आय पीएम सोसायटी तर्फे ‘फेलोशिप अवार्ड’ हा मानाचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. सदरील पुरस्कार “पशुवैद्यकीय अंतर्गत आणि प्रतिबंधात्मक औषधि सोसायटीचे चौथे वार्षिक अधिवेशन आणि एक आरोग्य दृष्टिकोनासह पशु आरोग्य आणि उत्पादकतेच्या सर्वांगीण विकासासाठी पशुवैद्यकीय औषधी शास्त्राची प्रगती” या विषयावरील राष्ट्रीय परिसवांदाच्या उद्घाटन समारंभात डॉ बी एन त्रिपाठी कुलगुरू, शेर ए काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ जम्मु व डॉ एम सी शर्मा ,माजी संचालक तथा कुलगुरू ,भारतीय पशु वैद्यकीय संशोधन संस्था इज्जतनगर यांचे हस्ते व डॉ राजेश काटोच अधिष्ठाता पशुवैद्यकीय महाविद्यालय जम्मु , व्हीआयपीएम संस्थेचे सचिव डॉ अशोक कुमार व सुंघटन सचिव डॉ निलेश शर्मा यांचे प्रमुख उपस्थितित देण्यात आला.

डॉ भिकाने यानी विद्यापीठात उदगीर, लातूर, अकोला व नागपूर येथे विविध पदावर ३४ वर्ष सेवा दिली असून उदगीर व अकोल्याचे पशुवैद्यक महाविद्यालये व अलिकडील काळात विस्तार कार्यातून विद्यापीठ अधिक लोकाभिमुख बनवण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या डॉ भिकाने यानी चिकित्सालयाच्या माध्यमातून निष्णात पशुवैद्यक विद्यार्थी घडवण्याबरोबर गरजू शेतकऱ्याना अहोरात्र सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे डॉ भिकाने यानी प्रयोगशाळेच्या चार भितिंत न अडकता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जावून अनेक तरुणाना प्रोत्साहित करून दुग्ध व शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वंयरोजगारासाठी प्रवृत्त केले आहे. त्यांनी मराठीतील लेख , रेडिओ/ दुरदर्शन वरिल मुलाखती , पशुरोग निदान शिबारे व शेतकरी प्रशिक्षण/ जागरूकता कार्यक्रम/ मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याना तांत्रीक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. गतवर्षी लंपी चर्मरोग साथीत रोगोपचार तसेच नियंत्रण कार्यात राज्य टास्क फोर्सचे मेंबर म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी शेळ्यातील प्लेग , म्हशीतील उरमोडी, लालमुत्र रोग,कोड फुटणे, सर्पदंश, रक्तदान, गोचीडताप, गजकर्ण आदी लोकोपयोगी विषयावर संशोधन केले असून त्यांचे दोनशेहून अधिक लेख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासीकात प्रकाशित झाले आहेत. त्यानी लिहलेली नउ इंग्रजी, मराठी पुस्तके देशभर पशुवैदयक व विद्यार्थ्यांत व राज्यात शेतकर्‍यात लोकप्रिय आहेत. त्यानी सलग १७ वर्ष राज्य शिक्षण मंडळ व बालभारतीत निमंत्रक या भूमिकेतून अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीत सहभाग घेतला आहे. त्याना राष्ट्रीय स्तरावरील तिन सुवर्णपदकासह माफसूचे आदर्श प्राध्यापक, सर्वोत्कृष्ट संशोधक व विस्तार कार्यकर्ता असे तिन्ही बहुमान मिळाले आहेत. याशिवाय त्यानी उदगीरच्या मराठवाडा जनता विकास परिषद, मराठी विज्ञान परिषद, जिव्हाळा ग्रुप व ग्रीन आर्मीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यानी मोलाचे कार्य केले आहे. सदरील पुरस्कार प्राप्त झाले बद्दल माफसुचे कुलगुरु डॉ नितिन पाटील , शिक्षण संचालक डॉ शिरीष उपाध्ये ,संशोधन संचालक डॉ नितिन कुरकुरे, डॉ सुधीर कविटकर , डॉ मुकेश श्रीवास्तव, डॉ बालाजी अंबोरे यांचे सह प्राध्यापक विद्यार्थी पशुवैद्यक आदीनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!