भारतीय जनता पार्टी ग्रामीण लातूरच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ओम भाऊ पुणे यांची निवड

0
भारतीय जनता पार्टी ग्रामीण लातूरच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ओम भाऊ पुणे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते श्री ओम भाऊ पुणे यांची भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रधान करण्यात आले. नियुक्तीनंतर ओम भाऊ पुणे पत्रकाराशी बोलताना म्हणाले की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ग्राम पातळीपासून शहर पातळीपर्यंत भाजपाच्या विचाराशी जोडणारी माणसं निर्माण करणार असल्याचे सांगितले.

या निवडीबद्दल त्यांचे भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष अशोक काका केंद्रे, भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या सरचिटणीस रेखाताई तरडे, माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, ऍडव्होकेट निखिल कासनाळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अमित रेड्डी यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व मित्र परिवारांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!