संत ज्ञानेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
संत ज्ञानेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेत वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे वर्णन केले. प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाषण स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर उपस्थित होत्या. यावेळी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सहभागी होत आपले विचार मांडले. या भाषण स्पर्धेत सर्वप्रथम स्वरांजली बोळेगाव, स्नेहा बोईनवाड द्वितीय वेदांत गांजरे, पंकजा जायभाये तृतीय आर्यन वाघमारेवेशभूषा स्पर्धेत प्रथम श्रावणी ताटीपामुलवार द्वितीय तेजस्विनी मोरताटे आणि तृतीय गौरी सूर्यवंशी व स्वराज कोकाटे या विद्यार्थ्यास मुख्याध्यापिका आशा रोडगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सविता करंडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी व आभार संगीता आबंदे यांनी मानले शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
