अहमदपूर विधानसभा मतदारसंघात नमो चषक 2024 ची जोरदार तयारी

0
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात नमो चषक 2024 ची जोरदार तयारी

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात नमो चषक 2024 ची जोरदार तयारी

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या सुचनेनुसार अहमदपूर, चाकुर विधानसभा मतदारसंघात 12 जानेवारी ते 25 जानेवारी च्या काळात विविध स्पर्धा घेऊन नमो चषक 2024 प्रभावी पणे राबविण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सदरील पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. नमो चषक 2024 मध्ये क्रिकेट, कब्बडी, वकृत्वस्पर्धा, गायन स्पर्धा, संगीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, अशा विविध स्पर्धांसाठी युवक,युवती, पुरुष, महीला या सर्वांना या नमो चषक स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाणार असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 50 हजार स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार असून सर्व स्पर्धेसाठी आॅनलाईन व आॅफलाईन नोंदणी करून घेण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धेसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र नियुक्त्या केल्या असून प्रभाग, जिल्हा परिषद गटामध्ये सदरील सर्व प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार असून सर्व प्रकारच्या स्पर्धेचे अंतिम सामने विधानसभा स्तरावर घेण्यात येणार असून वेगवेगळ्या स्पर्धेसाठी 15 ते 51 हजारापर्यंत रोख बक्षिसाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडून प्रमुख गणेश दादा हाके पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे.

सदरील पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी केले. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश सचिसचिव हेमंत गुट्टे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,बुथ विस्तारक चंदशेखर डांगे,शहराध्यक्ष सुशांत गुणाले, ओबीसी मोर्च्याचे तालुका अध्यक्ष दत्ता खंदाडे,जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,प्रदेश सदस्य,दत्तात्रय जमालपुरे,डाॅ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी,अल्पसंख्याक जिल्हा प्रभारी बबलू पठाण, तालुका सरचिटणीस माणिक नरवटे,परमेश्वर आढाव, महीला मोर्च्याच्या अध्यक्षा जयश्री केंद्रे, मन्नानभाई शेख, सरोजा पांचाळ, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे विविध मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. सदरील पत्रकार परिषदेनंतर दर्पण दिना निमित्ताने अहमदपूर व किनगाव येथील सर्व पत्रकार बांधवांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!