महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी

0
महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापक, थोर सत्यशोधक, कवयित्री आणि समाज क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यार बाबतचे सविस्तर वृत्त असे की, सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तत्त्वज्ञान विभागाच्या प्राध्यापक डॉ. सीमा उप्पलवार या उपस्थित होत्या. मान्यवरा्ंच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ .वसंत बिरादर पाटील म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी एकेकाळी सामाजिक क्रांती घडवून आणली होती आज पुन्हा एकदा त्यांच्या विचारांची समाजाला गरज निर्माण झाली असून प्रत्येक युवकांनी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग चिलगर यानी केले तरह आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बब्रुवान मोरे यानी केले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!