यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महोत्सव उत्साहात साजरा

0
यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महोत्सव उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महोत्सव उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती महोत्सव यशवंत विद्यालयात अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते दोन्हीही प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पर्यवेक्षक राम तत्तापुरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा शालेय जीवनामध्ये आदर्श घेऊन आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक राजकुमार गोटे पर्यवेक्षक अशोक पेदेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील निवडक विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मनोगतपर भाषणे झाले.
सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!