खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी उभा केलेल्या श्रीरामाच्या दरबाराची वल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

0
खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी उभा केलेल्या श्रीरामाच्या दरबाराची वल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी उभा केलेल्या श्रीरामाच्या दरबाराची वल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशभर 22 जानेवारी 2024 रोजी रामलीला उत्सव साजरा होतअसून आज दिवाळी साजरी झाली. लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानशूर तथा लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या पुढाकारातून अहमदपूर येथे श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृतीचे होमहवन करून विधीवत पुजन करून खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी लोकार्पण झाले होते.
गुजरात येथून आलेले वल्ड रेकॉर्डचे चेअरमन पवण सोळंकी यांनी सदरील रामदरबाराची वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याची घोषणा करून पदक व प्रमाणपत्र खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या पत्नी सौ. संगितामानलताई श्रृगांरे, मुलगी सौ. सुप्रीया पायाळ, जावाई शंतनू पायाळ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील यांना वल्ड रेकॉर्डचे चेअरमन पवण सोळंकी यांनी प्रदान केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. भारत चामे, माजी नगराध्यक्षा सौ. अश्विनी कासनाळे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,धैर्यशील देशमुख, चाकुरचे तालुका अध्यक्ष वसंत डिगोळे,अहमदपूर चे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, श्रीकांत देशमुख,शहराध्यक्ष सुशांत गुणाले,चंद्रशेखर डांगे, डॉ. सिद्धार्थ सुर्यवंशी, बालाजी गुट्टे,माणिक नरवटे,बालासाहेब होळकर,अमित रेड्डी,निखील कासनाळे, महीला तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे,रामनाथ पलमटे,धनजंय कोतावार, संगमेश्वर निला,संतोष कोटलवार, संजय माने,जिवण गायकवाड,प्रदीप वट्टमवार, पिंठू नाईक आदीजण उपस्थित होते.
अहमदपूर येथील थोडगा रोडवरील निजवंते नगर मधील भव्य प्रांगणात श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या भव्य दिव्य दोन लाख तिस हजार पणत्यामध्ये प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. सदरील श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृती उभ्या करुन अहमदपूर सह लातूर जिल्ह्यातील राम भक्तांचा खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांनी आनंद द्विगुणित केला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व हजारो महिला पुरुष रामभक्त यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी सुळ यांनी केले तर आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!