अहमदपूरात हजारो लोकांसाठी महाप्रसाद, होम, हवन करून महाआरती ने प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.
अहमदपूरात हजारो लोकांसाठी महाप्रसाद, होम, हवन करून महाआरती ने प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना समितीतर्फे हजारोंच्या उपस्थितीमध्ये विधिवत होम ,हवन व मंत्र उच्चार करत शहरातील नागरिक प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झाले होते
याच ठिकाणी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला. संपूर्ण शहर प्रभू श्रीरामाच्या भक्ती रंगांमध्ये रंगून गेलेले दिसुन आले
छत्रपती शिवाजी महाराज चौक व थोडगा रोड येथे अहमदपूरातील सकल व्यापारी बांधवाकडून 20000 लोकांसाठीच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी हजारोंच्या संख्येने महिला मुले व नागरिकांनी प्रसाद घेतला.
शहरातील चौका चौकामध्ये मोठी गर्दी झाली होती तरुण मंडळी कपाळाला चंदन व तिलक लावून जय श्रीराम च्या घोषणा देताना दिरून येत हाते
थोडगा रोड येथे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या श्रीराम दरबार येथे महिला अबाल वृद्धांनी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती तसेच या ठिकानाहुन हजारो रंगीत फुगे आकाशात सोडण्यात आले व अतिशबाजी ही करण्यात आली. या ठिकाणी आयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळा एलईडीच्या मोठ्या स्क्रीन वरती लाईव्ह दाखवण्यात आला.
अहमदपूर शहरात घराघरावर भगवे ध्वज लावलेले दिसत होते एकूणच सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता
अहमदपूर शहर मागील चार दिवसापासून प्रभू श्रीराम भक्तीने नाव्हुन निघाले आहे व सर्वत्रच हर्षाने उल्हासाचे वातावरण झालेले दिसले
शेकडो वर्षापासून ची सर्वांची प्रतीक्षा संपली असून अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. हे आपल्या डोळ्याणे पाहण्यात येत आहे हे मोठे भाग्य असून यापेक्षा मोठे सुख आणखीन काय असू शकते! एकूणच हा
आनंदाचा सोहळा ठरला
