अंधोरीचे माजी उपसरपंच श्रीधर सूर्यवंशी यांचे दुःखद निधन

0
अंधोरीचे माजी उपसरपंच श्रीधर सूर्यवंशी यांचे दुःखद निधन

अंधोरीचे माजी उपसरपंच श्रीधर सूर्यवंशी यांचे दुःखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : अंधोरी येथील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, दयानंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तुकाराम सूर्यवंशी यांचे दि. 21 रोज रविवार दुपारी दोन वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी अंधोरी येथे दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी दिनांक 22 रोज सोमवार सकाळी दहा वाजता अंधोरी येथील मराठा स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
15 जुलै 2022 ला राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीधर सूर्यवंशी यांना क्रीडा महर्षी शंकराव बुवा साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने श्रीधर सूर्यवंशी यांना ज्येष्ठ कबड्डी खेळाडू पुरस्कार देऊन त्यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक भास्कर सूर्यवंशी यांचे वडील होत.
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!