अहमदपूर तालुक्यात मराठा व खुल्या प्रवर्ग नागरिकाचे सर्वेक्षण

0
अहमदपूर तालुक्यात मराठा व खुल्या प्रवर्ग नागरिकाचे सर्वेक्षण

अहमदपूर तालुक्यात मराठा व खुल्या प्रवर्ग नागरिकाचे सर्वेक्षण

सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी व तहसीलदार शिवाजी पालेपाड यांचे आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांचे दि. १७ जानेवारी रोजी पत्र आले असून या तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्ग नागरिकांचे व इतर समाजाचे सर्वेक्षण करण्याचे काम प्रत्यक्षात दि. २३ जानेवारी रोज मंगळवारपासून सुरू होणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी व तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये व केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात शासनाकडून युद्धपातळीवर कामे चालू असून हे सर्व्हेक्षणाचे काम दिनांक २३ जानेवारीपासून सुरू होऊन ते दि. ३१ जानेवारी अखेरला संपवायचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम आज पासून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तातडीने करण्यात येणार आहे. हे सदरचे काम मोबाईल ॲप द्वारे केले जाणार आहे. यासाठी वेळ फारच कमी आहे. प्रत्येकाने आपल्या गावी उपस्थित राहून येणाऱ्या कर्मचारी प्रगनक यांना माहिती देण्यात यावी असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

आपल्या गावचे तलाठी यांच्यामार्फत सर्व गावांमध्ये दवंडी देऊन आपल्या गावामध्ये कुटुंबप्रमुख यांनी उपस्थित राहून नियुक्त केलेल्या प्रगनक यांना माहिती देण्यात यावी. यामध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गतील नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे व इतर समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम प्रत्यक्षात दि. २३ जानेवारी रोज मंगळवारपासून गावो गाव करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणात जे प्रगणक येतील त्यांना आपल्या कुटुंबाची परिपूर्ण माहिती द्यावी. सर्व्हेक्षणाचे काम वेळेत आणि बिनचूक होण्यासाठी शासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी आणि तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांच्याकडून एका प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आलेले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!