घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी याचा नगरपंचायत समोर उपोषणाचा दुसरा दिवस.
देवणी (प्रतिनिधी)
एकीकडे पंतप्रधान मोदीजी देशाला कर्जमुक्तीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून मेहनत करीत आहेत. तर एकीकडे देवणी शहरातील अन्यायकारक घटना वाढत चाललेल्या दिसून येत आहेत. घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी रा.देवणी यांने दिनांक १८ जानेवारी रोजी नगरपंचायत ला निवेदन दिले होते. त्या निवेदनात लिहिले होते की, घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी हा दोन वर्षापासून नगरपंचायतीत घंटागाडी चालक म्हणून काम करीत होता. नगरपंचायतीतील सर्व कर्मचाऱ्यांना ६०००महिना पगार व पीएफ देण्यात येत होते. आपल्या रास्त मागण्यासाठी यापूर्वी नगरपंचायतीतील सर्व कर्मचारी उपोषणात बसले होते. त्या उपोषणात घंटागाडी चालक सूर्यवंशी हा पण उपस्थित होता. त्या उपोषणाचे सर्व कर्मचाऱ्यांना नगरपंचायतने कामावरून कमी केले होते. अशी माहिती दिलेल्या निवेदनात लिहिली होती.त्यामुळे त्याचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांने नगरपंचायतला २३ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांने कर्ज घेऊन स्वतच्या रोजी रोटीचा व पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.घनकचरा स्वच्छता मध्ये कामावर घंटागाडी चालक म्हणून रुजू करून घ्यावे, गेल्या दोन वर्षापासून कामावर असून त्याच्यासोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेतले पण यालाच का नाही? या कर्मचाऱ्याला देखील कामावर रुजू करून घ्यावे, दोन वर्षाचे पीएफ द्यावे, दोन वर्षाचे किमान वेतनाप्रमाणे राहिलेला पगार तात्काळ द्यावे , काम केलेली पगार व पीएफ पासबुक वर तात्काळ जमा करावे, असे उपोषणकर्ता सुनील सूर्यवंशी याच्या मागण्या आहेत.या सर्व गोष्टीची चर्चा पूर्ण देवणी तालुक्यात पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. आधीच म्हणतात अन्यायाच्या विरोधात गरीब सर्वप्रथम पुढे असतो, प्रशासनाने गरीबाचा असा फायदा घेऊ नये,नगरपंचायत त्या उपोषणकर्त्याचा कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे का ? त्या गरीब घरच्या मुलाला कामावर रुजू करून घ्यावे, अन्यथा त्या मुलाची परिस्थिती पाहून नागरिकांत कधी आक्रोशाचे वातावरण निर्माण होईल सांगता येत नाही. अशी चर्चा नागरिकांत मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.