स्पर्धा परीक्षा जीवनाचे अविभाज्य अंग आहे – प्रा.ज्ञानेश्वर पाटील

0
स्पर्धा परीक्षा जीवनाचे अविभाज्य अंग आहे - प्रा.ज्ञानेश्वर पाटील

स्पर्धा परीक्षा जीवनाचे अविभाज्य अंग आहे - प्रा.ज्ञानेश्वर पाटील

संत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक मेळावा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा ही जीवनाचे अविभाज्य अंग बनली आहे म्हणून विद्यार्थ्यांना बालवयापासूनच स्पर्धा परीक्षेला बसवावे असे जाहीर आवाहन माऊली स्पर्धा परीक्षा केंद्राची संचालक प्रा. ज्ञानेश्वर पाटील यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.
या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.ज्ञानेश्वर पाटील, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक मीना तोवर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा उज्वला मोघे, उपस्थित होत्या.
प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना पालकांची डोळ्याची भाषा कळली पाहिजे. स्पर्धा परीक्षा काळाची गरज आहे म्हणून आपण अन्ननसाधारण महत्त्व दिले पाहिजे.पालकांनीही स्वतः थोडा वेळ द्यावा. अभ्यासात सातत्य ठेवावे. पाल्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे मत व्यक्त केले.यावेळी पालक वर्गातून उज्वलाताई मोघे यांनी माता पालकांनाही मोलाचं मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सतिश साबणे यांनी केले.तर आभार शारदा तिरूके यांनी मानले.
यावेळी माहे डिसेंबर चाचणीचे पेपर पालकांना दाखवण्यात आले .या पालक मेळाव्यास खूप मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!