भारतीय जनता युवा मोर्चा अहमदपूर च्या वतीने नव मतदाता संमेलन उत्साहात संपन्न…!

0
भारतीय जनता युवा मोर्चा अहमदपूर च्या वतीने नव मतदाता संमेलन उत्साहात संपन्न…!

भारतीय जनता युवा मोर्चा अहमदपूर च्या वतीने नव मतदाता संमेलन उत्साहात संपन्न…!

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बालाघाट तंत्रनिकेतन, रुद्धा – अहमदपूर येथे राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नमो नवमतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.
यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मतदारांना ऑनलाइन संबोधित करताना सांगितले देशाच्या विकासामध्ये नव तरुणांचा मोठा वाटा आहे. आम्ही फक्त देशाला प्रगती कडे नेण्यासाठी काम करत असून यासाठी आम्हाला तरुण वर्गाची गरज आहे. भारतामधील बेरोजगारी, महिला सुरक्षितता, तीन तलाक, व्यवसायाकरीता मुद्रा लोन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यासारखे कित्येक योजना गरिबांसाठी प्रभावीपणे राबविल्या देशातील भ्रष्टाचार बंद केला, प्रत्येक कार्याला गती दिली. देशाचा कणा मजबूत करण्यासाठी नव मतदारांनी योग्य व्यक्तीची निवड करावी असे आव्हान केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर चाकूर विधानसभा प्रमुख गणेश हाके यांनी नव मतदारांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले पहिल्यांदा मतदान करणार आहात निवडणुकीमध्ये निर्भयपणे, धर्म,जात, वंश, समाज, भाषा इत्यादी विचारांच्या प्रवाखाली न येता कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करून भारताचे जबाबदार नागरिक बनावे असे सांगितले.
यावेळी ओबीसी प्रदेश चिटणीस ज्ञानोबा बडगिरे, भाजपा ता अध्यक्ष प्रताप पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामानंद मुंडे, भाजपा शहराध्यक्ष सुशांत गुनाले,कुलदीप हाके, महिला आघाडी अध्यक्ष जयश्री केंद्रे,भाजपा ता उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, भाजपा युवा मोर्चा ता सरचिटणीस सुमित बिल्लापट्टे, भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी सह नवीन मतदार हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!