विद्यार्थी परिषदेच्या वतीने चे वलांडी येथे झालेल्या अत्याचाराचा विरोधात उदगीर मध्ये “निषेध मार्च”
विद्यार्थी परिषदेच्या वतीने चे वलांडी येथे झालेल्या अत्याचाराचा विरोधात उदगीर मध्ये "निषेध मार्च"
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शाखेच्या वतीने वलांडी ता. देवणी येथे 6 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथून “निषेध मार्च” काढून छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आले. देवणी तालुक्यामध्ये असलेल्या वलांडी गावामध्ये सहा वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केले. जिहादी वृत्तीची मानसिकता असणाऱ्या या नराधमाने अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर अभाविप उदगीर शाखेच्या वतीने या वृत्तीचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे करण्यात आला व या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
“जिहादी वृत्ती असणाऱ्या लोकांकडून समाजातील महिला सुरक्षित नाहीत, अशा वृत्तीला आळा घालण्याचे काम सरकारने करावे, हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारला रामराज्य व स्वराज्यातल्या महिला कशा सुरक्षित राहत होत्या याचा विसर पडलेला दिसतोय आणि या सरकारचा धाक राहिलेला दिसत नाही. त्यामुळे जिहादी वृत्तीचे नराधम अशा घटना करताना दिसत आहेत. सरकारने या जिहादी वृत्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी.” असे मत अभाविप लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष मनोज पुदाले शहरमंत्री आदिनाथ मिरकले, सहमंत्री सुमित लाल, आदित्य पाटील, नितीश शिरसे, अरविंद गुंडिले, पृथ्वीराज बिरादार, दिनेश भोसले, गणेश बिरादार, प्रभात सूर्यवंशी, संध्या हत्त्ते, धनश्री लाळे, वैभवी लाळे, पल्लवी पाटील, वैशाली राठोड, प्रीती बिरादार, गायत्री कसबे, राजनंदिनी कांबळे, आनंद साबणे, अभिजीत पाटील सह विद्यार्थी, विद्यार्थीनी व उदगीर शहारातील नागरिक उपस्थित होते.
