वलांडी येथील अत्याचाराच्या निषेधार्थ हाळी-हंडरगुळी येथे रास्तारोको
वलांडी येथील अत्याचाराच्या निषेधार्थ हाळी-हंडरगुळी येथे रास्तारोको
उदगीर (प्रतिनिधी) : वलांडी तालुका देवणी येथील सहा वर्षीय मुलीवर एका वासनांध नराधमाने बलात्कार केला आहे, या घटनेचा तिव्र निषेध म्हणुन विविध सामाजिक व धर्मीय युवकांनी दि.५-२-२४ रोजी सकाळी हाळी-हंडरगुळी येथे रास्तारोको केला. यावेळी पोउपनी.एम.के.गायकवाड यांना आरोपीस फाशी देण्यात यावी तसेच अत्याचारग्रस्त बालिकेचे रक्षण व पुनर्वसन करण्यात यावे.या मागणी चे निवेदन देण्यात आले.यावेळी छ. शिवाजी महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन व आरोपीस फाशी द्या.आदी मागण्यांचे फलक हाती घेऊन शेकडो युवकांनी निषेधाच्या घोषणा देत रॅली काढली.तद्नंतर राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला.या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, उपसरपंच हाळी राजू पाटील,जब्बार तांबोळी,युवासेना जिल्हासचिव रमन माने,भाजप तालुका अध्यक्ष एस. बी.धुप्पे,जिवन माने, सिध्देश्वर माने , जंन्टू दादा माने,महेश सुर्यवंशी,महादू धुमाळ,पवन बोळेगावे,पवन कलवले, राहूल सुर्यवंशी,सिध्दू सुर्यवंशी,कचरु माने सह शेकडो युवक रास्तारोको मध्ये सामील झाले होते.यावेळी संजय राठोड,रमण माने,प्रकाश तेलंगे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच पोउप निरीक्षक गायकवाड, एम.के.जमादार, संजय दळवे,माधव सारोळे,दयानंद उर्फ सोनू सोनकांबळे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चौख बंदोबस्त ठेवला.
