वलांडी घटनेच्या निषेधार्थ अहमदपुरात आक्रोश मोर्चा
वलांडी घटनेच्या निषेधार्थ अहमदपुरात आक्रोश मोर्चा
अहमदपूर (गोविंद काळे) : देवणी तालुक्यातील वलांडी येथील ६ वर्षे वयाच्या मुलीवर ज्या नराधमाने अत्याचार केला. त्याच्या निषेधार्थ अहमदपुरात दि.६ रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
देवणी तालुक्यातील वलांडी येथील सहा वर्ष वयाच्या चिमुकलीवर नराधमाने अनैसर्गिक कृत्य केले. त्याच्यावर देवणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु त्यास फाशीची शिक्षा व्हावी, सदर प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवून प्रकरण लवकरात लवकर निकाली काढून आरोपीस
फाशीची शिक्षा देण्यात यावी,आरोपीस त्याच्या कुटुंबीयांचे या प्रकरणात सहकार्य असल्यामुळे
आरोपीच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीस सह आरोपी करावे, पीडित मुलींचे व आरोपीचे घर एकमेकांसमोर असल्यामुळे पीडित कुटुंबीयांची सोय इतरत्र करावी.
अथवा पिडित कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीच्या कुटुंबीयास गावबंदी करण्यात यावी. जेणेकरून पीडित कुटुंबीयास दाब, दडपण निर्माण होणार नाही, पीडित मुलीचे शिक्षण बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, या पद्धतीच्या प्रकरणात फाशीची शिक्षा देण्यात यावी असा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, या मागण्यांसाठी अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्याने हिंदू जन आक्रोश
मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सकल हिंदू बांधवासह महिला, महाविद्यालयातील विद्यार्थी,
विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी हा मोर्चा तहसील कार्यालयावर
धडकला. यावेळी तहसीलदारांना खालील मागण्यांचे निवेदन दाखल करण्यात आले.
