मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात रुग्ण वाहिकेचे लोकार्पण व विविध कार्यक्रम संपन्न

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात रुग्ण वाहिकेचे लोकार्पण व विविध कार्यक्रम संपन्न.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात रुग्ण वाहिकेचे लोकार्पण व विविध कार्यक्रम संपन्न.

बीड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड शहर मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठिक 11 : 00 वाजता रुग्ण वाहिकेचे लोकार्पण, त्यानंतर 11 : 30 वाजता शासकीय जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. तसेच शहरातील पुरातन मंदिर परीसरात वृक्षारोपण कार्यक्रम, व सायंकाळी 05 : वाजता रोड वरील भटकंती करणाऱ्या गरीब लोकांना अन्नदान, खिचडी, फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून शिवसेना वैद्यकीय मदत बीड शहर कक्ष प्रमुख रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांच्याकडून बीड शहरातील गरीब व गरजू रुग्णांच्या सेवेकरिता बीड जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाशल्य उप चिकित्सक नागेशजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील वार्ड मध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राचे आरोग्य दूत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या रुग्णसेवेच्या प्रेरणेतून गरजु रुग्णांपर्यंत रुग्ण सेवा पोहचवण्याचे काम रुग्ण मित्र रोहित ऊर्फ (बाळासाहेब) धुरंधरे हे बीड शहरात करत आहेत. या आरोग्य सेवेच्या महायज्ञ मध्ये महत्त्वाचे योगदान देणारे विनोदभैया जोगदंड, सालपे, सतीश शिंदे, विनोद चांदणे, दत्ताभाऊ, सुनिता चव्हाण , कांबळे , यश दुनघव आदी शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!