दि. 12 फे ब्रुवारी 2024 रोजी डी.बी. लोहारे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्‍त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

0
दि. 12 फे ब्रुवारी 2024 रोजी डी.बी. लोहारे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्‍त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

दि. 12 फे ब्रुवारी 2024 रोजी डी.बी. लोहारे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्‍त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षण महर्षि, दलित मित्र डी. बी. लोहारे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्‍त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षि, दलित मित्र डी. बी. लोहारे गुरुजी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्‍त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन यशवंत संकुल, अंबाजोगाई रोड, अहमदपूर येथे 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात आले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भक्‍तिस्थळ अहमदपूर येथील आचार्य गुरुराज स्वामी हे उपस्थित राहणार असुन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्‍न होणार आहे.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणुन शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतिष चव्हाण, आ. बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, मा. आ. बब्रुवान खंदाडे, भाजपा प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भा.रा. काँ.चे जिल्हा सरचिटणीस सांबप्पा महाजन, कृ.उ.बा.स. मा. सभापती शिवानंद हेंगणे, जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. बी. एन. पौळ, शिवसेना जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, पं.स. मा. सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे, मा. नगराध्यक्षा सौ. अश्‍विनीताई कासनाळे, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, तहसीलदार शिवाजी पालेपाड, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, डॉ. एस. एस. एम. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल मुळे, टागोर शिक्षण समिती उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, डॉ. एस. एस. एम. प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सौ. सुनिताताई चवळे आदींची उपस्थिती राहणार आहे.
तरी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर,वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा समिती पदाधिकारी, सदस्य यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!