ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ वर्षांपूर्वी शिक्षणाचे दालन लोहारे गुरुजींनी उघडले – आ. सतीश चव्हाण
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ वर्षांपूर्वी शिक्षणाचे दालन लोहारे गुरुजींनी उघडले - आ. सतीश चव्हाण
अहमदपूर (गोविंद काळे ) : सुमारे साठ वर्षांपूर्वी अहमदपूर सारख्या डोंगराळ दुष्काळी तालुक्यातील वाडी तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शाळा व वसतिगृह उघडले यामुळेच या विद्यार्थ्यांचे आयुष्य शिक्षणामुळे खेड्यापाड्यातून उत्कर्षाकडे वळले असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी अहमदपूर येथे डी बी लोहारे गुरुजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भक्ती स्थळाचे आचार्य गुरुराज स्वामी हे होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख माजी मंत्री बाळासाहेब जाधव ,माजी मंत्री विनायकराव पाटील , भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील ,माजी आमदार बब्रुवान खंदाडे ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी , अयोध्याताई केंद्रे, अश्विनीताई कासनाळे, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज कल्याणकर, अनिल मुळे, डॉक्टर भालचंद्र पैके, प्रा. डॉक्टर सुनीताताई चवळे, स्वागत अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर राष्ट्रीय खनन उद्योग सदस्य डॉक्टर अनिल कांबळे ांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, गणेश दादा हाके, शिवानंद हेंगणे, आयोध्याताई केंद्रे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
अध्यक्षीय समारोप करताना भक्ती स्थळाचे आचार्य गुरुराज स्वामी यांनी संघर्षातून हा शिक्षणाचा वटवृक्ष उभा केला अहमदपूरला शिक्षणाची पंढरी बनवली व याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना झाला आज यशवंत चे यशवंत विद्यार्थी जगभर कार्यरत असल्याचे सांगितले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष डॉ . अशोक सांगवीकर यांनी केले सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार प्रा .डॉ सुनिता चवळे यांनी मानले .
या कार्यक्रमा मध्ये राष्ट्रीय खेळाडू साईप्रसाद जगवाड, रोहिणी पाटील, दिव्यांका कदम यांचा तर आदर्श शिक्षक प्राचार्य रामलिंग मुळे, कलाशिक्षक महादेव खळुरे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांचा आचार्य गुरुराज स्वामी यांच्या हस्ते सन्मान करणयात आला.
हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्राचार्य गजानन शिंदे ,प्राचार्य दिलीप मुगळे, के डी बिराजदार, राजकुमार गोटे, अशोक पेद्येवाड, सोमनाथ स्वामी, श्रीधर लोहारे, राजकुमार पाटील, प्रा शिवशंकर पाटील, प्रा. रविशंकर इरफळे, प्रा. गणेश मुस्तापुरे, प्रा .अनिल चवळे ,बालाजी सोनटक्के यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
