मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील मौजे शंभू उमरगा येथे जिल्हा आंधत्व निवारण समिती उदगीर व लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीर विधानसभेचे विकास पुरुष राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी मतदारसंघात पाच हजार मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पाटील यांनी केले. व अध्यक्षस्थान लोकनियुक्त सरपंच लिंगेश्वर स्वामी यांनी भूषविले. या शिबिरात 115 नागरिकांची तपासणी करून 43 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी लायन्स नेत्र रुग्णालय,उदगीर कडे रवाना करण्यात आले. प्रसंगी उपकेंद्राचे सी. एच. ओ. डॉ. अभिजीत नरवटे, देवर्जनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ .किरण गोरे , डॉ. हवना, डॉ. प्रशांत गायकवाड माजी सैनिक वैजनाथ ईश्वर शेट्टें, ग्रामपंचायत सदस्य संग्राम गंगथडे हे उपस्थित होते.
