रिद्धी सिद्धी बाल रुग्णालयात बालकांचे हिमोग्लोबिन तपासणी व समुपदेशन शिबिर संपन्न

0
रिद्धी सिद्धी बाल रुग्णालयात बालकांचे हिमोग्लोबिन तपासणी व समुपदेशन शिबिर संपन्न

रिद्धी सिद्धी बाल रुग्णालयात बालकांचे हिमोग्लोबिन तपासणी व समुपदेशन शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या राष्ट्रीय बालरोगतज्ञ संस्थेच्या संकल्पनेतील वर्ल्ड ॲनिमिया अवेरनेस डे रक्तालपता जागरूकता दिन दरवर्षी 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. या निमित्ताने संस्थेचे उदगीर शाखेचे उदगीर असोशियन ऑफ पेडियाट्रिक्स सचिव डॉ. संतोष बाबुराव बिरादार यांनी यावर्षी पुढाकार घेऊन याबद्दलचे हिमोग्लोबिन तपासणी व समुपदेशन शिबिर रिद्धी सिद्धी बाल रुग्णालय येथे आयोजित करून संकल्पपूर्ण राबविले.यात बालकांचा आहार, जंकफूडचे दुष्परिणाम, रक्तअल्पतेमुळे होणारे गंभीर आजार व त्यावरील उपाय याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 60 बालकांचे हिमोग्लिन तपासण्यात आले. या शिबिरात उदगीर मधील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगीराज चिद्रे, भूलतज्ञ डॉ. धनराज मुळे, दंतचिकित्सक डॉ. पंकजा संतोष बिरादार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शहरातील बालक, पालक तसेच शिक्षक उमेश तीर्थे, प्रा. शादुल शेख, शैलेश वाडकर, सचिन बिरादार, रोहित वाडकर, तातेराव शिकारे, श्याम पाटील, लक्ष्मण निडेबने, सुहास गोंगे, मुख्याध्यापक अरविंद ढोबळे व रिद्धी सिद्धी बाल रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!