नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावेल – डॉ.विश्वंभर गायकवाड
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावेल - डॉ.विश्वंभर गायकवाड
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी विद्यार्थ्याकडे ज्ञानप्राप्ती व आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी, भारतातील लोकसंख्येला गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी व संशोधनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली प्रदान करणे ही काळाची गरज लक्षात घेऊन भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 लागू केले आहे. असे शिवाजी महाविद्यालय,उदगीर येथील प्रा.डॉ. विश्वंभर गायकवाड यांनी मत व्यक्त केले.देवणी येथील पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, देवणीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक युवक नेतृत्व शिबिर सावरगाव (ता..देवणी) येथे उद्धेश्वर शिक्षण संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातील बौद्धिक सत्रामध्ये “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०” व “स्पर्धा परीक्षा” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.बी.एन. नागलगावे होते. प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.विशंभर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
