छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण जीवनात वाटचाल करावी : ना. संजय बनसोडे

0
छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण जीवनात वाटचाल करावी : ना. संजय बनसोडे

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण जीवनात वाटचाल करावी : ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या तरुण पिढीने डोळ्यासमोर ठेवुन जीवनात मार्गक्रमण केले तर आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून नक्कीच समाजासमोर उभे राहून यश संपादन करु शकतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा
आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण वाटचाल करावी असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.ते उदगीर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर ,सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज एकंबेकर, मनोज पुदाले, सावन पस्तापुरे, उमाकांत तपशाळे, अजित पाटील, सुदर्शन मुंडे, पो.नि. करण सोनकवडे, डाॅ.दत्ता पाटील, अमोल निडवदे, कुणाल बागबंदे, शहाजी पाटील तळेगावकर, मदन पाटील, बिपीन पाटील, चंद्रकांत टेंगेटोल, उषाकिरण बिरादार, प्रतिभा मुळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरात सकाळी ८ वाजता महाराजांना अभिवादन केले. यावेळी शिवजन्मोत्सवानिमित्त बाळ शिवबाच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर
भव्य अशा शिवकालीन देखाव्याची मिरवणुक व मोटारसायकल रॅली काढण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मतदार संघातील कोदळी, घोणसी व जळकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!