दिव्यांग विद्यार्थ्याला पदव्युत्तर पुस्तकांसाठी सतीश उस्तुरें यांची मदत
दिव्यांग विद्यार्थ्याला पदव्युत्तर पुस्तकांसाठी सतीश उस्तुरें यांची मदत
उदगीर (एल.पी.उगीले) : पदवीचे पर्यंत चे शिक्षण अंधांसाठी असलेल्या आधुनिक सॉफ्टवेअरद्वारे घेणे ज्यांच्यामुळे शक्य झाले त्यांचे आभार मानन्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षणासाठी आवश्यक विशेष पुस्तकांसाठी सतीश उस्तुरे यांनी मदत केली . यामुळे त्याला विशेष पुस्तकांची खरेदी करून पदवीनंतरचे शिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे.
निराश न होता, आहे ती परिस्थिती स्वीकारून इच्छा शक्तीच्या बळावर जिद्दीने मार्ग काढीत, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करीत पदवी प्राप्त करून आता पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या अमोल महाके याचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे सतीश उस्तुरे यांनी या प्रसंगी सांगितले.
दोन्ही डोळ्या मागील रक्त वाहिन्यांची वाढ खुंटून रक्त पुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही डोळ्याने अकाली अंधत्व आलेल्या अमोल महाके यास पदवी शिक्षण घेता येत नव्हते, अशा वेळी काय करावे ?हे त्याला समजत नव्हते . अनेकांना या बाबत विचारीत असताना त्याची भेट उदगीर येथे मागील २६ वर्षापासून संगणकाचे ज्ञान देणारी पहिली संस्था स्थापन केलेले सतीश उस्तुरे यांची भेट झाली.
यावेळी खास अंध दिव्यांगासाठी बनविण्यात आलेल्या सॉफ्टवेअर बाबत माहिती देवून, त्याच्या खरेदीसाठी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांनी आर्थिक मदत केली होती. अमोल महाके यांनी या डेस्कटॉप डिव्हाईस या सॉफ्टवेअरच्या मदतीने बी ए ची पदवी प्राप्त करत ७०% टक्के गुण घेऊन पास झाला .आपले गुणपत्रक घेऊन अमोल यांनी सतीश उस्तुरे यांची भेट घेत पदव्युत्तरचे शिक्षण घेणार असल्याची ईच्छा बोलावून दाखवली. अमोल महाके यास पुढील शिक्षण व सॉफ्टवेअरसाठी लागणारी आर्थिक मदत सतिश उस्तुरे यांनी पुन्हा केली . त्यामुळे या विद्यार्थ्याचे पदव्युत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण होणार आहे.
अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्या नंतर घाबरून न जाता आपले शिक्षण घेण्यासाठी दुसरा काही मार्ग आहे का? याचा शोध घेत असताना सतीश उस्तुरे यांची अमोल याने भेट घेतली . अंधत्व आल्यामुळे शिक्षण थांबवू नये, संगणकाच्या मदतीने पुढील शिक्षण घेता येवू शकते. असा धीर देवून अंध दिव्यांगासाठी असलेल्या सॉफ्टवेअर बाबत संपूर्ण माहिती दिली. आधुनिक सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत केल्यामुळे या सॉफ्टवेअर च्या मदतीने जिद्दीने अमोल ने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.त्याला आणखी शिक्षण घेता यावे यासाठी उस्तूरे यांनी मदतीचा हात दिला आहे.
यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी , सतीश उस्तुरे, प्रा .बिभीषण मद्देवाड , सचिन शिवशेट्टे, प्रा. ग्रंथपाल उषा सताळकर , प्रा. अश्विनी देशमुख ,राहुल जाधव यांच्या सह कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .
