विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमाची सवय लावून घ्यावी – कुलदीप हाके

0
विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमाची सवय लावून घ्यावी - कुलदीप हाके

विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमाची सवय लावून घ्यावी - कुलदीप हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या या स्पर्धेच्या युगात कष्टाला पर्याय नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता शालेय जीवनापासून परिश्रम घेणे आवश्यक आहे कारण सध्याचे युग हे स्पर्धेचा युग असून या स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता टिकवायची असेल तर आपल्याला त्या ध्येयाच्या पूर्तते करिता परिश्रम करणे नितांत आवश्यक आहे असे प्रतिपादन श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक कुलदीप हाके यांनी केले.
ते आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी सुनेगाव येथे आयोजित केलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सम्राट चंद्रगुप्त मौर्य पब्लिक स्कूलच्या संचालिका शिवालिका हाके, शाळेचे पर्यवेक्षक बुर्ले राजाराम शेख ,जिलानी संतोष मुळे आदींची उपस्थिती होती. या निरोप समारंभाच्या प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे दिला जाणारा आदर्श विद्यार्थ्यांचा पुरस्कार इयत्ता बारावी कला शाखेच्या सुरनर दीक्षा राजेंद्र या विद्यार्थिनीला प्राप्त झाला तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या गुणवंत तथा यशवंत विद्यार्थ्यांचा व विविध खेळात प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवालिका हाके म्हणाल्या की आपली शाळा ग्रामीण भागातील असून सुद्धा शहरी भागाच्या गुणवत्तेला आपण अभ्यासात किंवा अभ्यासेतर कार्यक्रमाच्या रूपाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये चेतना निर्माण करण्याचे कार्य या शाळेमध्ये नेहमी केले जाते हे प्रशंसनीय आहे. याप्रसंगी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतही व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगत उच्च माध्यमिक चे संतोष मुळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन दैवशाला शिंदे यांनी केले तर आभार संभाजी दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश चेपुरे ,अच्युत सुरनर, अमोल सारोळे, तुकाराम शिंगडे, कौशल्या देवकते, चिंतन गिरी, प्रदीप रेड्डी,जनार्दन मासोळे, तेजस्विनी फाजगे, संदेश हाके,शेख हिदायत, विश्वंभर सुरनर, अनंत उदगिरे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!