श्री सेवा जनरल हॉस्पिटल अंधोरी च्या वतीने मोफत स्त्रीरोग निदान शिबिर संपन्न
श्री सेवा जनरल हॉस्पिटल अंधोरी च्या वतीने मोफत स्त्रीरोग निदान शिबिर संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : श्री सेवा जनरल हॉस्पिटल आणि आशा हॉस्पिटल लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वंभर स्वामी तर उद्घाटक सरपंच सौ.प्रफुल्लाताई ब्रिंगणे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रवींद्र सुरवसे साहेब होते. यावेळी ग्रा. प. सदस्य बापूराव देऊळकर, विठ्ठल मंगे, डॉ देवकत्ते, शिवव्याख्याते बळुभाऊ केंद्रे,हर्सद कांबळे, गणेश देवकाते, बळीराम लोहारे या सर्वांचे स्वागत आयोजक डॉ विजयकुमार राठोड यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी डॉ रवींद्र सुरवसे यांनी स्त्रिरोगविषयी सखोल मारगदर्शन केले.तसेच अंधोरीच्या सरपंच यांनी पण स्त्रियांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलुभाऊ केंद्रे यांनी केले.या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले ते श्री सेवा जनरल हॉस्पिटल अंधोरी,तसेच नारायणा निसर्गोपचार महाविद्यालयाचे संचालक डॉ विजयकुमार राठोड, डॉ नागनाथ देवकत्ते, हरसद कांबळे, बापूराव देऊलकर, गणेश देवकत्ते, ओम फुलारी, बळीराम लोहारे तसेच आशा हॉस्पिटल लातूर येथील सर्व स्टाफ उपस्थित होता. या स्त्रिरोग शिबिरात एकूण 170 रूग्णांची तपासणी करून औषध गोळ्या मोफत देण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.
