डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त समाधीस्थळी लिंगस्थापना ; गडकरींची उपस्थिती

0
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त समाधीस्थळी लिंगस्थापना ; गडकरींची उपस्थिती

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त समाधीस्थळी लिंगस्थापना ; गडकरींची उपस्थिती

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीवर लिंग स्थापना सोहळा दि. २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मंडप पूजनाचा सोहळा मंगळवारी पार पडला.
दि. २३ फेब्रुवारी रोजी वीरमठ संस्थांन ते भक्तस्थळ अशी शोभायात्रा काढण्यात येणार असून याच दिवशी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे हे उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेत सात नद्या, तीन समुद्र, व बारा ज्योतिर्लिंग जलाभिषेकाचा आरंभ होणार असून दि. २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील सर्व शिवाचार्य यांच्या उपस्थितीत अति रुद्राभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, भास्करराव पाटील खतगावकर, अजित गोपछडे यांची उपस्थिती लाभणार आहे. तर दि. २५ रोजी मुख्य सोहळा असून सर्व भक्तगण व शिवाचार्य यांच्या हस्ते समाधी लिंग स्थापना होणार असून या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री भागवत कराड, आ. बाबासाहेब पाटील, माजीमंत्री विनायकराव पाटील, माजी आ. बब्रुवान खंदाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अशोकराव केंद्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या सोहळ्यात आंध्र, कर्नाटक, तेलंगाना मधील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमानिमित्त दि. २० रोजी मंडप पूजन करण्यात आले. यावेळी भक्ती स्थळ प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी महाराज, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभरगेकर, सचिव सुप्रिया घोटे, सिद्धेश्वर पाटील उदगीर, मनमत आप्पा पालापुरे, अॅड. गंगाधर कोल्हे, शीलाताई शेटकर, बाबुराव देशमुख, धन्यकुमार शिवणकर, उमाकांत अप्पा शेटे, निळकंठ बिराजदार, ओम पुणे, शिवकुमार उटगे, राजकुमार कल्याणी, रामलिंग तातापुरे, उमा हामणे, प्रा. विश्वंभर स्वामी यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!