लिनेस क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0
लिनेस क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

लिनेस क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : लिनेस क्लब स्थानिक शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गीत, पोवाडा, भाषण अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी श्रीमती वनिता पाटील यांनी मला शिवबा भेटले तर या विषयावर उपस्थितांना माहीती दिली. अध्यक्षीय समारोप श्रीमती सुनंदा कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमात लिनेस क्लबच्या नुतन सदस्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन वनिता पाटील तर आभारप्रदर्शन प्रतिभा गोरटे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!