शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा

0
शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा

शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा गौरव दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे ,प्रमुख मार्गदर्शिका म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ.श्रीदेवी कबाडे व प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवर पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ.कबाडेबाईंनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर व जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी सर्वांनी अगोदर आपली मातृभाषा मराठी शिकली पाहिजे.दैनंदिन जीवनात मराठी भाषा शुद्ध स्वरूपात बोलली पाहिजे.त्यात इतर भाषेतील शब्द वापरु नयेत.आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे.असे सांगितले.सुत्रसंचलन सौ.दिपाली भावसारबाईंनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!