जगता जगता मरते शेतकऱ्याची बायको – कवी आनंद चिंचोले

0
जगता जगता मरते शेतकऱ्याची बायको - कवी आनंद चिंचोले

जगता जगता मरते शेतकऱ्याची बायको - कवी आनंद चिंचोले

उदगीर (एल.पी.उगीले) : शेतकऱ्यांना अधिकचे कर्ज झाल्यामुळे त्यांची बायको त्याला कुठला आर्थिक भार पडू नये, म्हणून त्याची काळजी घेते. धडपडत घराला आकार देते.’ नवरा आत्महत्या करेल म्हणून लई घाबरते शेतकऱ्यांची बायको .जगता जगता मरते शेतकऱ्यांची बायको ‘ अशी कविता सादर करत रसिकांना कवी आनंद चिंचोले यांनी अंतर्मुख केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्री हावगीस्वामी महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने आयोजित
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे व मराठी विभागप्रमुख डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे उपस्थित होते. सुरुवातीला कु.श्रद्धा नागरगोजे यांनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कवी वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केले.
पुढे बोलताना कवी आनंद चिंचोले म्हणाले की, सध्या नवीन पिढीला जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर साधने उपलब्ध आहेत.याचा फायदा या पिढीने विचार करून घेतले पाहिजे.मोबाईलच्या जास्त वापरामुळे नवीन पिढी संस्कारहीन होत चालली आहे.आपल्या भावना विचार व्यक्त करण्यासाठी साहित्य निर्मिती केली पाहिजे.प्रत्येक माणूस कवी असतोच परंतु जी व्यक्ती भाषेतून व्यक्त होऊन आपले विचार मांडते ती कवी होते.मराठी भाषा जिवंत रहाण्यासाठी मराठी माणसांनी मराठी भाषेत लेखन, मराठी भाषा आणि साहित्याचे लेखन तसेच मराठी भाषेत बोलले पाहिजे.मराठी भाषेची अभिरूची वाढविण्यासाठी दर्जेदार साहित्य अभ्यासक्रमाला ठेवले पाहिजे.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गरीब माय, सध्याची शिक्षणपद्धती या विषयावर कविता सादर केल्या.
मराठी भाषेची वाईट स्थिती चित्रण करणारी कविता सादर करताना ते म्हणाले,’ माय’ ची जागा
आता मम्मी घेईल.एक दिवस माय शब्दचं बुडून जाईल ‘मराठीतील शब्दांचा भाषेत वापर न केल्यामुळे अनेक शब्द नामशेष होत आहेत ही खंत व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, की,वि.वा.शिरवाडकरांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.मराठी साहित्य आणि भाषा चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांचे साहित्य माणूस,समाज, राष्ट्र जोडणीसाठी महत्वाचे असल्याचे सांगत त्यांचे साहित्य समाजाला प्रेरणादायी आहे.त्यांनी आत्मनिष्ठ आणि जाणीवनिष्ठ साहित्याची निर्मिती केली असे विचार यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ.विठ्ठल गोरे, प्रा.वीरभद्र बिरादार, ग्रंथपाल प्रा. अजित रंगदळ, प्रा.ज्योती संपाळे, प्रा.राठोड , राजू उप्परबावडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु.शुभांगी बिरादार तर आभार डॉ.म.ई.तंगावार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!