श्यामार्य कन्या विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांना निरोप‎ समारंभासह जागतिक मराठी भाषा गौरव दिन‎ संपन्न

0
श्यामार्य कन्या विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांना निरोप‎ समारंभासह जागतिक मराठी भाषा गौरव दिन‎ संपन्न

श्यामार्य कन्या विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांना निरोप‎ समारंभासह जागतिक मराठी भाषा गौरव दिन‎ संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामार्य कन्या विद्यालयात वर्ग दहावी मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे संस्थाअध्यक्ष सुपोषपाणि आर्य होते. तर श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती पंडित, पर्यवेक्षक प्रवीण भोळे मंचावर उपस्थित होते. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निरोप समारंभ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था ही बोलके पोपट तयार करण्याचे कारखाना नसून या ठिकाणी गुणवत्तापूर्ण, कौशल्यपूर्ण, सर्वगुणसंपन्न विद्यार्थिनी बनवण्यासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सपोषपाणि आर्य यांच्या मार्गदर्शनातून विविध उपक्रम राबवले जातात. या विद्यालयातून बाहेर पडलेली प्रत्येक विद्यार्थिनी ही सर्वगुणसंपन्न असते. आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत ती प्रयत्नाची पराकाष्ठा करते. आमच्या विद्यालय कडून हा निरोप नसून तुमच्या भावी आयुष्यासाठीच्या शुभेच्छा आहेत ,असे प्रास्ताविकातून पर्यवेक्षक प्रवीण भोळे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
लातूर जिल्ह्यातील आर्ट्स व कॉमर्स या विभागात सर्वोच्च काम करणारे महाविद्यालय म्हणजेच श्यामार्य कन्या उच्च माध्यमिक विद्यालय आहे. प्रत्येक वर्षी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के असतो. दहावीच्या नंतर काय या संदर्भात माहिती प्राध्यापक मदन पाटील यांनी दिली.
शाळा सोडताना खूप वाईट वाटतंय, शाळेविषयी खूप आपुलकी आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शाळेने आणि शिक्षकांनी खूप सांभाळून घेतलं. अभ्यासाशिवायच्या इतर उपक्रमात, कलाक्षेत्रात शाळेने खूप काही संधी मिळवून दिल्या. अनेकदा नाटकाच्या सरावासाठी शाळेने, शिक्षकांनी सांभाळून घेतले. शाळा संपल्यानंतरही शाळेला भेट देत राहणार आहे. आपण कितीही मोठे झालो तरी शाळेला विसरू शकत नाही, आशा आशयाचे भाषणनातून कांचन मोरे, लक्ष्मी बिरादार, सृष्टी बिरादार, स्नेहा बिरादार, निकिता वाघमारे, अनुश्री जीवने, आदिती गुरमे, विनिता आर्य, रंजना बिजले, वैष्णवी जरीपटके, गंगासागर नरहरे, श्रद्धा कलुरे ,धनश्री शिंदे, साईनाथ शिंदे, सबुरी माने, ऋतुजा बोधनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र विविध शाळेत आल्यामुळे त्या शाळेचा परिचय आपल्याला नसतो. न घाबरता व कॉफी मुक्त परीक्षा व उत्तरपत्रिका संदर्भात परीक्षा विभाग प्रमुख संजीव पाटील यांनी माहिती दिली.
वर्ग दहावीनंतर शिक्षणासाठी विविध शाखा असतात. गोंधळून जाऊन किंवा इतरांच्या सांगण्यावरून शाखा न निवडता आपल्या आवडीनुसार व कलेनुसार पुढील शिक्षणाच्या शाखा निवडाव्यात. आमच्या संस्थेतून मिळालेली ज्ञानाची शिदोरी ही नक्कीच भविष्यात तुम्हाला यशस्वी करेल. असे अध्यक्षीय समारोपातून संस्था अध्यक्ष सुपोषपाणी आर्य यांनी मनोगत व्यक्त केले, आणि दहावी बोर्ड परीक्षेसाठी तसेच भावी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विजय बैले, राहुल गुरमे, संभाजी कोयले व अन्य सर्व शिक्षक उपस्थित होते. निरोप समारंभ निमित्य सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे यांनी तर आभार वैशाली अनकल्ले यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!