रोटरी क्लब च्या वतीने यशवंत विद्यालयात सॅनिटरी पॅड नॅपकिन मशीन वितरित.
रोटरी क्लब च्या वतीने यशवंत विद्यालयात सॅनिटरी पॅड नॅपकिन मशीन वितरित.
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील यशवंत विद्यालयया मध्ये रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने सॅनिटरी पॅड व डिस्पोजल मशीनचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून टागोर शिक्षण समितीच्या सहसचिव प्रा. डॉ. सुनिता चवळे उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मीनाक्षी करकनाळे या उपस्थित होत्या.
या मशीनचे वितरण प्रा. डॉ .सुनिता चवळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रोटरीच्या सदस्या संगीता खंडागळे, वृषाली चवळे,रिया घाटोळ, अश्विनी कलमे, चेतना हसरगुंडे , रोटीरीचे अध्यक्ष शिवशंकर पाटील ,सचिव श्रीराम कलमे मुख्याध्यापक गजानन शिंदे उपस्थित होते.
रोटीरी ने महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला असून शहरातील दोन शाळांना या मशीनचे वितरण करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात बोलताना प्रा.डॉ. सुनिता चवळे मॅडम यांनी रोटीरीच्या कार्याचा गौरव केला. रोटरी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन केले.
डॉक्टर मीनाक्षी करकनाळे यांनी शालेय मुलींच्या वैद्यकीय समस्या बद्दल मार्गदर्शन केले
त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी केले तर आभार श्रीधर लोहारे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी सोनटक्के, झोळगीकर मॅडम, स्वामी मॅडम , हाळे मॅडम, कांबळे मॅडम, साकोळे मॅडम यांनी प्रयत्न केले.
