सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यास जन्मठेप.लातूर न्यायालयाचा निकाल

0
सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यास जन्मठेप.लातूर न्यायालयाचा निकाल

सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यास जन्मठेप.लातूर न्यायालयाचा निकालसुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यास जन्मठेप.लातूर न्यायालयाचा निकाल

लातूर (एल.पी.उगीले) : सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या सासऱ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.व्ही.पाटील यांनी जन्मठेपेची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्याचा सश्रम कारावास तसेच कलम 506 अन्यवये याच गुन्ह्यात दोन वर्षे सश्रम कारावास व 25 हजाराचा दंड ठोठावला दंड न भरल्यास सहा महिन्याचा कारावास तसेच आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती नुकसान भरपाई म्हणून पीडितेस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्याबद्दल अधिक माहिती अशी की, सन 2019 मध्ये सुनेवर सासऱ्या कडून अत्याचार झाल्याची घटना घडली होती. सदर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 75/2019 कलम 376 2 (एन) 315,323, 34 भादवी प्रमाणे सासरा व इतराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक बावकर यांनी व त्यांच्या टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याच्या योग्य रितीने तपास करुन तपासात साक्षीदार तपासून भरपूर पुरावे शोधून नमूद आरोपी विरुद्ध सबळ दोषारोप न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
पीडिता घरी एकटी असताना तिला तुझे कुऱ्हाडीने तुकडे करतो, असे धमकावत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेने तिच्या पती व सासुला सांगितले असता त्यांनी आमची बदनामी करायची नाही, असे सुनावले. व त्यानंतर आरोपी सासऱ्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केला. याबाबत भादा पोलिस ठाण्यात पीडितेच्या सासु, सासरा व नवऱ्या विरेधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सपोनी पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरण प्रलंबित असताना पीडितेचा नवरा वारला. या खटल्यात सरकार पक्षाने सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता जयश्री उत्तमराव पवार, ट्रायल मॉनीटरिंग सेल चे स.पो.नी. धनंजय ढोणे, महिला पोलीस अमलदार कोरे यांनी काम पाहिले. पीडिता व साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरीत न्या. व्ही.व्ही पाटील यांनी आरोपीला उपरोक्त शिक्षा ठाठावली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!