गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन प्रभात आणि निकिता यांचा अनोखा विवाह

0
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन प्रभात आणि निकिता यांचा अनोखा विवाहगरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन प्रभात आणि निकिता यांचा अनोखा विवाह

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन प्रभात आणि निकिता यांचा अनोखा विवाह

उदगीर (एल.पी.उगीले) : विवाह समारंभातील अनावश्यक खर्च टाळून प्रभात आणि निकिता या वधूवरांनी सामाजिक जाणीव जपत, जीवन प्रयाग फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, किल्ला गल्ली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी मंचावर प्रमुख वक्ते संतोष कुलकर्णी, प्रमुख पाहुणे बामणी गावचे सरपंच सौ. प्रभावती राजकुमार बिराजदार, वधू निकिता वर प्रभात उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संतोष कुलकर्णी म्हणाले, विवाह सोहळ्यात आपण खर्च तर करतोच परंतु आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने खारीचा वाटा उचलून शैक्षणिक क्षेत्रामध्ये समाजाची, गरजू विद्यार्थ्यांची मदत केली पाहिजे.गणेश मंदिर, अशोक नगर, उदगीर येथे प्रभात आणि निकिता यांचा शुभविवाह संपन्न झाला.अण्णाभाऊ साठे नगर ,किल्ला गल्ली ,उदगीर येथील रहिवाशी प्रभात अमृत सूर्यवंशी यांच्या विवाह निमित्त शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले.यामध्ये वही, पेन, खोड रबर, पेन्सिल, शॉपनर, फुटपट्टी या वस्तूचा समावेश होता. आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिपरत्वे आपण काहीतरी देणे लागतो, हेच देणे आणि त्याची कृतज्ञता लक्षात घेऊन आगळा वेगळा विवाह साजरा करत समाजातील गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत प्रभात आणि निकिता यांनी त्यांच्या विवाह निमित्त जीवन प्रयाग फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन सुमित लाल तर आभार बाळासाहेब बिराजदार यांनी मानले. यावेळी सतीश चव्हाण, अरविंद शिंदे ,सुमित लाल, कुणाल शिंदे, प्रणव कांबळे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!