स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भावी कलाकार निर्माण होतात भाजपा प्रवक्ते – गणेश दादा हाके पाटील
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भावी कलाकार निर्माण होतात भाजपा प्रवक्ते - गणेश दादा हाके पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : मानवी जीवनामध्ये कलेला असाधारण महत्त्व असल्याचे सांगून कलेमुळे माणूस लोकप्रिय होतो आणि त्याचे खरे बालकडू शालेय व महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातूनच मिळते. म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात अग्रक्रमाने सहभागी व्हावे असे आग्रही प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी केले.
ते दि. 10 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या समयी उद्घाटक म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाच्या चिटणीस रेखाताई हाके पाटील, भाजपाचे जिल्हा चिटणीस ऍडव्होकेट भारत चामे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, ओबीसीचे सरचिटणीस ज्ञानोबा बडगिरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.हनुमंत देवकते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश पुणे, संस्थेच्या उपाध्यक्ष एडवोकेट मानसी हाके, कुलदीपभैय्या हाके, शिवलिकाताई हाके, भाजपा प्रदेश सदस्य दत्तात्रय जमालपुरे , प्राचार्य डॉ.वसंत बिराजदार, केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाले, परमेश्वर पाटील , पर्यवेक्षक रामलिंग तत्तापूरे,सरपंच रमेश कांबळे, भाजपाचे उपाध्यक्ष संतोष कोटलवार, भाजपाचे तालुका सरचिटणीस माणिक नरवटे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
स्नेहसंमेलनाचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्वर माऊली आणि कै.अशोकराव हाके- पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलन सकाळी दहा वाजता सुरू झालेले तब्बल आठ तास अविश्रांतपणे चालले. यात श्रीराम प्रभूंचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, शाहिरी, जिजाऊ, स्वच्छता व पर्यावरण, योगा, मोबाईलचे दुष्परिणाम, समाजसुधारकांच्या जीवनावर एकांकिका, नाटिका, भारुड, भावगीत,भक्तीगीत, लोकगीते, लावणी ,हिंदी, मराठी गीते, विडंबन आणि रिमिक्सच्या गीताने रसिकांची मने कलाकारांनी जिंकले.
यावेळी रेखाताई तरडे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख यांची मनोगत पर भाषणे झाली.
स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे- तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन शारदा तिरुके, सतीश साबणे यांनी तर आभार मीना तोवर यांनी मानले.
यावेळी माता पालक, पिता पालक, शिक्षण प्रेमी नागरिक आणि रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
बहारदार वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
