लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत शहीद दिन साजरा
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत शहीद दिन साजरालालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत शहीद दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्याल म्हणूनयात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून, शहीद दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे तर,प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करुन देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन केले. मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यापैकीच भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना दिनांक २३ मार्च रोजी फाशीची शिक्षा झाली होती. त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या कथा सांगितल्या. अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आपल्या देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलेले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही देशवेसाठी सदैव तत्पर रहावे असे आवाहन केले. सूत्रसंचलन तुकाराम पेद्दावाड यांनी केले.
