चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्य 03 सराईत गुन्हेगारांना घातक शस्त्रासह अटक.

0
चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्य 03 सराईत गुन्हेगारांना घातक शस्त्रासह अटक.
लातूर (एल.पी.उगीले) चोरी करण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार लपून बसले होते, त्या तीन सराईत गुन्हेगारांना घातक शास्त्रासह अटक करण्यात मुरुड पोलिसांना यश आले आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लोकसभा निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाणे स्तरावर सदरच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून पोलीस ठाणे हद्दीमध्ये त्या-त्या पोलिस स्टेशनद्वारे सतर्क व प्रभावी पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
मालाविषयक व शरीराविषयी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात येत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांचे नेतृत्वात दिनांक 28/03/2024 रोजी पोलीस पथकामार्फत पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये सतर्क पेट्रोलिंग सुरू असताना रात्री 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास काही इसम चोरी करण्याच्या इराद्याने मुरुड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व लपवून अंधारामध्ये दबा धरून बसल्याचे पोलीस पेट्रोलिंगच्या अधिकारी अमलदारांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलीस पेट्रोलिंग वरील अधिकारी, अमलदारांनी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने दबा धरून बसलेल्या तीन इसमांना त्यांच्याकडील लोखंडी खंजीर, तलवार सारख्या धारदार व घातक शस्त्रासह मुरुड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, नमूद इसम हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याला चोरी, जबरी चोरी, मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले असून आरोपी नामे
मैनुद्दीन इरफान पठाण,( वय 24 वर्ष,राहणार बरकत नगर, लातूर), चंद्रकांत अंबादास जाधव, (वय 35 वर्ष, राहणार दीपज्योती नगर, लातूर),नागेश बब्रुवान थोरात, (वय 40 वर्ष,राहणार सैनिकपुरी पाटी, खाडगाव रोड, लातूर).
यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अन्वये तीन आरोपीवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस ठाणे मुरुडचे पोलीस अमलदार करीत आहेत.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मुरुड पोलीस रात्रगस्त वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सतर्क पेट्रोलिंग केल्याने एकाच रात्रीत चोरीच्या गुन्ह्यातील सराईत तीन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले त्यामुळे चोरीची मोठी घटना टळली आहे.
सदरची कारवाई पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या नेतृत्वात पोलीस सफौ चव्हाण, पोलीस अमलदार बोईनवाड, सूर्यवंशी, तिगीले, शिंदे, मस्के, कुंभार, भोसले, रवि कांबळे, किर्ते, खुमसे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *