उमरगा यल्लादेवी येथिल ग्रामस्थांना मतदान करण्याची दिली शपथ

0
उमरगा यल्लादेवी येथिल ग्रामस्थांना मतदान करण्याची दिली शपथ

उमरगा यल्लादेवी येथिल ग्रामस्थांना मतदान करण्याची दिली शपथ

(स्वीप पथकातर्फे मतदार बंधूभगिणींना शपथ देऊन करण्यात आली जनजागृती)

अहमदपूर (गोविंद काळे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अहमदपूर- चाकूर तहसीलच्या वतीने स्वीप कला पथकाकडून दि.28 रोजी सकाळी उमरगा यल्लादेवी येथिल ग्रामस्थांना 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठीची ग्रामस्थांना शपथ देण्यात आली.
माझा भारतातील लोकशाहीवर पूर्ण विश्वास असून, मी शपथ घेतो की, आम्ही आमच्या देशातील लोकशाही परंपरांची प्रतिष्ठा राखू आणि निर्भयपणे, मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांची प्रतिष्ठा अबाधित ठेवून जात, समुदाय,भाषा किंवा इतर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव न घेता येणाऱ्या 7 मे रोती लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत माझ्या कुटुंबातील सर्व मतदार बांधवाचे तसेच माझे नातेवाईक,शेजारी मित्र बांधवाकडून 100% मतदान करुन घेणार यासाठी मी माझे राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे.असे स्वीप पथकाचे प्रमुख महादेव खळुरे यांनी ग्रामस्थांना शपथ दिली.
वरील अभियानासाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाने मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून उमरगा (य) येथे गावातील नवतरुण,वयोवृध्द तसेच महिला मतदार भगिणींना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी
शपथ देऊन घोषवाक्याचे पोस्टर व लोकगीतातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,चंद्रकांत पेड,धनंजय नाकाडे यांच्यासह तलाठी नवनित जामनिक, मंडळाधिकारी विशाल केंचे गावातील प्रतिष्ठित नागरिक गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!