दार उघड राजा दार उघड,मतदानाचं दार उघड!
दार उघड राजा दार उघड,मतदानाचं दार उघड!
(मतदानासाठी अंधोरी येथे जोगवा गीतातून मतदार जनजागृती)
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा निवडणूक 2024 जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कलापथकाद्वारे प्रबोधनकार,कीर्तनकार नागनाथ स्वामी यांनी जोगवा मतदानाचा या लोकगीतातून अंधोरी येथे जनजागृती केली.
लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करण्यात येत असून दि.28 रोजी सायंकाळी अंधोरी या गावातील मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे जाहीर आवाहन स्वीप पथकातर्फे करण्यात आले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती करत आहे.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,चंद्रकांत पेड,पुरुषोत्तम काळे यांच्यासह गावातील तलाठी दिंगाबर मेंढके ,ग्रामसेवक दिलीप खंडाळे आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक बस्वेश्वर थोटे तर उपस्थितीतांचे आभार महादेव खळुरे यांनी मानले.गावातील सुजान मातदार बांधव,महिला मतदार भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.
