होय..! आम्ही वयोवृद्धच..!पण आम्ही शंभर टक्के मतदान करणार..!

0
होय..! आम्ही वयोवृद्धच..!पण आम्ही शंभर टक्के मतदान करणार..!

होय..! आम्ही वयोवृद्धच..!पण आम्ही शंभर टक्के मतदान करणार..!

किनगाव (गोविंद काळे) : मोळवण या गावात स्वीप कलापथकाच्या माध्यमातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पारंपारिक लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
तसेच गावातील सुजान नव मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी दि.29 रोजी सकाळी मोळवण या गावात स्वीप पथकातर्फे जाहीर आवाहन करण्यात आले.
गावातील वयोवृद्ध मतदार आजी-आजोबांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली. गावातील 80 ते 85 वय असलेले आजी-आजोबांनी येणाऱ्या 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मतदान करणारच ! असे जाहीर मत मांडले.मतदान हा आमचा हक्क आहे आणि आम्ही ते हक्क मागील 40 वर्षापासून बजावत आहोत. यावर्षीही आम्ही मतदान करणारच !अशी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ग्वाही दिली.
लातूर जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये मतदानाचे जनजागृती निर्माण व्हावे यासाठी स्वीप कलापथकाचे सदस्य तबला विशारद,मोहन तेलंगे यांनी भारुड या प्रबोधात्मक लोकगीतातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती केली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,जयसिह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती करत आहे.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,चंद्रकांत पेड, यांच्यासह मोळवणचे तलाठी सौदागर वैदय,ग्रामसेवक पिराजी शेटवाड,कोतवाल बालाजी दहिफळे,प्रतिष्ठित नागरिक गीता दहिफळे,श्यामल मुरकुटे,रंजना कातकडे ,भाग्यश्री दहिफळे संगिता राख आदिसह वयोवृद्ध मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नागनाथ स्वामी तर उपस्थितीतांचे आभार महादेव खळुरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!