जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता 15 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता 15 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत लघुपाटबंधारे ग्रामीण पुरवठाचे कनिष्ठ अभियंता वर्ग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 15 पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील पार येथे पंधराव्या वित्त आयोग जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत लघुपाट बंधारे ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत प्राप्त निधी मधून पाईपलाईन व नळ कनेक्शन जोडणीचे काम केले होते. या कामापोटीचे बिले काढण्यासाठी बळीराम पंढरीनाथ सोनकांबळे (53 वर्ष) यांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली त्यापैकी पंधरा हजार रुपये आता व उर्वरित रक्कम देयक मिळाल्यानंतर स्वीकारण्याचे पंचासमोर मान्य केले करून लाचेची रक्कम स्वतः कार्यालयात पंचांसमोर स्वीकारले तर यामधील सहाय्यक आरोपी पंडित मच्छिंद्र शेकडे (39 वर्ष) खाजगी इसम व्यवसाय शेती यांनी ही लाच देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून या दोन आरोपी विरुद्ध अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करणे चालू आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर येथील पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर हे करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई लातूरचे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक अनवर मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, शिवशंकर कच्छवे, रूपाली
भोसले, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, संतोष क्षीरसागर यांनी पार पाडली.
