धार्मिक सलोखा; मस्जिदीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न

0
धार्मिक सलोखा; मस्जिदीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न

धार्मिक सलोखा; मस्जिदीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न

‘ मस्जिद परिचय व रोज़ा इफ्तार ‘
कार्यक्रमास हिंदू बांधवांकडून प्रतिसाद
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील मस्जिद-ए-शमसिया येथे हिंदू बांधवांसाठी मस्जिदीमध्ये कशा पद्धतीने धर्माचे आचरण आणि नमाज पठण करण्यात येते. त्यासाठीच्या सुविधा व सोयीबद्दल विस्तृत अशी माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन मस्जिद-ए-शमसियाचे अध्यक्ष साजीदभाई सय्यद यांनी केले होते.यावेळी उपस्थित हिंदू समाजामध्ये मस्जिदी विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.शहरातील मस्जिद-ए-शमसिया, चारटांगी या ठिकाणी’ मस्जिद परिचय व रोज़ा इफ्तार ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत उपस्थित हिंदू समाजातील बांधवांना मुस्लीम समाजाचे कुरान-ए-शरीफ आणि त्यांचे प्रेषित यांच्याबद्दल विस्तृत माहिती सांगण्यात आली.
पवित्र रमज़ान महिन्यात रोज़े का ठेवतात ? रोज़ा काय आहे ? रोज़ा ठेवण्याची पध्दत काय आहे? रोज़्याचे फायदे काय आहे ? नमाज पठणाची वास्तविकता काय आहे? ईश्वराचे आदेश काय आहेत. आणि सर्व मानव जातीला कशा पद्धतीने वागणूक वर्तन आणि व्यवहार करावयाचे असते तसेच मस्जिदीची ठेवण कोणत्या पद्धतीची असते, भाईचाऱ्याने राहण्याचे संकेत कसे दिले जातात, मुस्लीम समाजाविषयी असलेला गैरसमज कशा पद्धतीने वाढत आहे? ध्वनिक्षेपणावरून प्रार्थनाविषयी अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झालेले आहेत. ते दूर करण्यासाठी व मस्जिदीत कशाप्रकारे ईश्वराचे नामस्मरण केले जाते याविषयी धर्म अभ्यासक मौलाना आखील शेख यांनी सांगितले.
यावेळी डॉ. शिवाजी काळगे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, आयपीएस पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, डॉ. अशोक सांगवीकर, माजी महापौर विक्रम गोजमगुंडे, शंकरप्पा भालके, सुधिर गोरटे, अभिमन्यू धोंडगे, संचालक संजय पवार, राजू खंदाडे, विकास महाजन, सोमेश्वर कदम, डॉ. वैभव रेड्डी, केदार काडवदे, बाबुराव बावचकर,यतिराज केंद्रे, सत्यनारायण काळे, प्रा.गोंविद शेळके, चंद्रकांत मद्दे,बाबासाहेब कांबळे, डॉ. गणेश कदम, डॉ. प्रदिप वट्टमवार,मुजमील सय्यद, राहूल शिवपूजे, बंडप्पा कासनाळे, जर्रान पठाण, डॉ. सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी,डॉ. गुणाले, डॉ. सुरजमहल सिंहाते,डॉ. पेड, डॉ. भोसले, डॉ. अमृत चिवडे, डॉ. जवणे,सुप्रिय बनसोडे, श्रीकांत बनसोडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, लक्ष्मीकांत बनसोडे, प्रशांत शिंदे, रवी कासनाळे, देवानंद मुळे,तौसीफ सय्यद डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. खडके, प्रकाश फुलारी आदी उपस्थित होते.

आपला देश विविध आस्था, धर्माचा देश आहे, सांप्रदायिक सद्भावना जोपण्यासाठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता, बंधुता प्रेम, जातीच्या सलोखा वृध्दीगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेच्या प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.’मस्जिद परिचय व रोज़ा इफ्तार ‘ कार्यक्रमास हिंदू बांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!