संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे ज्युनियर आय.ए.एस परीक्षेत नेत्रदीपक यश
अहमदपूर (गोविंद काळे) : माहे जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या ज्यूनियर आय.ए.एस परीक्षेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. या परिक्षेत 14 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यात देशमुख श्रेयश अमोल राज्यात दुसरा, भंडे श्रावणी हरिदास राज्यात तिसरी, शेकडे अथर्व नागनाथ राज्यात चौथा, कुलकर्णी ओजस अमोल, मिर्झा अल्कामा मेहबूब, देशमुख श्रेयस अजय, ढगे वरद महालिंग, ढोले अभिजीत कपिलेश्वर, चाटे अभिजीत गोविंद, किरडे पार्थ हनुमंत, दुधाटे आर्या भानुदास, शेख मोहम्मद नोमान रफिक अहमद, नळेगावकर गार्गी चंद्रशेखर, खुर्देळे सानिका भानुदास या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना सहशिक्षिक अश्विनी घोगरे,शबाना शेख, त्रिगुणा मोरगे, सविता पाटील, संजीवनी गुरुमे, वैष्णवी शिंगडे, सतीश साबणे, प्राजक्ता भोसले, शारदा तिरुके यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, संस्था उपाध्यक्षा ऍड.मानसी हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे,मुख्याध्यापक आशा रोडगे ,मुख्याध्यापक मीनाक्षी तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.