समाजासाठी जेलमध्ये सडलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय इंचभर हि मागे हाटणार नाही – संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
समाजासाठी जेलमध्ये सडलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय इंचभर हि मागे हाटणार नाही - संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
श्रीक्षेत्र रोकडोबा देवस्थान, परचंडा येथे संवाद बैठक
अहमदपूर (गोविंद काळे) : आमिश दाखवून माणसं फोडली जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल, सध्या आमच्या गोरगरीब मराठा बांधवावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम ग्रहमंत्र्याकडून जाणूनबुजून होत आहे. तरी समाज बांधवांनी अशा खोटया गुन्ह्याला न घाबरता समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, माझ्यावरही ढिगभर गुन्हे दाखल केले आहेत तरी मी एक इंच भर ही मी डगमगलो नाही वा कोणत्या आमिषाला बळी न पडता गद्दारी केली नसुन वेळ पडली तर समाजासाठी जेलमध्ये सडलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय इंचभर हि मागे हाटणार नाही, असे प्रतिपादन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
ते सकल मराठा समाज परचंडा व समस्त गावकरी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ध्वजारोहन व संवाद बैठकीत बोलत होते. सुरुवातीस व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास नतमस्क होवून पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. किशन महाराज परचंडेकर उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायच आहे, त्याला नक्कीच पाडेल. मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केलेत. परंतु, मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. कोणाला निवडून आणायचं हे समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आई बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये.मी बोलतो पक्षाला आणी मी बोललेला राग येतो तेही मराठयाच्या नेत्याला. गोरगरीब मराठयानी आता नेत्यापेक्षा आपल्या जातीला व मुला बाळाला मोठ मानायच.
मराठा समाजाचे तरूण बापा पेक्षा नेत्याला मानत असुन नेत्याच्या मुलांना भैय्या, दादा म्हणत आहेत तेच भैय्या, दादा आपल्या लेकरांना एकेरी नावाने बोलतात. आता यापुढे मराठा तरुणानी नेत्या ऐवजी समाजाला बाप मानले तर मराठा समाज मागे राहणार नाही. म्हणून नेत्याना अजिबात महत्व देवू नका, असे ही जरांगे पाटील म्हणाले .
श्रीक्षेत्र रोकडोबा देवस्थान परचंडा येथे जरांगे पाटील यांनी रोकडोबा चे पुजन करून गेल्या ७० वर्षा पासुन मंदिरावर गुढी पाडव्या निमित्त भगव्या ध्वजारोहनाची कायम परंपरा चालत आलेल्या भगव्या गुढी चे ध्वजारोहन जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा ध्वज कायम वर्षभर फडकतच असतो अशी येथील परंपरा आहे. रोकडोबा देवस्थानन समीती व गावकऱ्याच्या वतीने जरांगे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला .
