डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 150 जणांचे रक्तदान.!

0
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 150 जणांचे रक्तदान.!

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 150 जणांचे रक्तदान.!

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील सम्राट मित्र मंडळ व बौद्ध नगर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 150 जणांनी रक्तदान करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंतीनिमित्त रक्तदान करून अभिवादन केले.

या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवकनेते डाॅ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी हे होते.प्रमुख पाहूणे म्हणून तक्षशिला बुद्ध विहाराचे संस्थापक पूज्य भन्ते महाविरो थेरो, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,माजी नगरसेवक शेषेराव ससाणे,रामानंद मूंडे,माजी मुख्याध्यापक वाय.डी.वाघमारे, रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर, गफारखान पठाण, विद्यासागर श्रृंगारे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबीर चालले. अहमदपूर शहर व परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून प्रत्यक्षात रक्तदान केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख, माजी सभापती अशोकरावजी केंद्र,माजी नगराध्यक्ष अँड.भारतभाऊ चामे,श्रीकांतभाऊ बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे,
अण्णाराव सूर्यवंशी,गोविंदराव गिरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर स्वामी, शिवाजीरावगायकवा,प्रा.दिनकर मद्देवार,रत्नाकर नळेगांवकर, गणेश मूंडे,बालाजी पारेकर, मेघराज गायकवाड आदींनी रक्तदान शिबीरास भेटी देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी समर्पित होते.त्यामुळे समाजाने त्यांचीच प्रेरणा घेऊन समाजाच्या सक्षम आरोग्यासाठी अशा रक्तदान शिबिराची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर आभार जयंती मंडळाचे अध्यक्ष सुनील तिगोटे यांनी केले.
सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भालेराव,भीमराव कांबळे,सचिन बानाटे, प्रशांत जाभाडे,शिवाजीराव भालेराव,दिलीप भालेराव,सूधीर जोंधळे,आकाश पवार, डॉ.बालाजी थीट्टे,शरद सोनकांबळे तसेच बौद्ध नगर भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष अनिल तिगोटे, संभाजी जाभाडे,अभिजित सोनकांबळे, अभिषेक ससाणे,माधव तिगोटे, अनिल वाघमारे, सिद्धार्थ (डॉन) वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, सुनील तिगोटे, विठ्ठल ससाणे, सिध्दार्थ बनसोडे, सिध्दार्थ गायकवाड, भैय्यासाहेब सोनकांबळे, आनंद सोनकांबळे,मिलींद कदम, संविधान कदम, राजवीर मतकर, रोहन गायकवाड, आशिष सोनकांबळे, दिनेश तिगोटे, प्रकाश लांडगे, वैभव सोनकांबळे, सिध्दांत कांबळे, अभय गुळवे, माणिक गुळवे, रितेश रायभोळे, सतिष कदम, सावळाराम बनसोडे, अनिल वाघमारे, डॉन वाघमारे, बापू वाघमारे, किरण जाभाडे, बालाजी वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, रवि बनसोडे, राहूल वाघमारे, शांतीशिल ससाणे आदी सह असंख्य बांधवांनी पूढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!