सुलोचनाबाई हामणे यांचे दुःखद निधन
सुलोचनाबाई हामणे यांचे दुःखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : येथील वीरशैव लिंगायत समाजातील जेष्ठ महिला कार्यकर्ती सुलोचनाबाई मल्लिकार्जुनप्पा हामणे यांचे दि.1 1रोज गुरूवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान वयाच्या 90 व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .
त्यांचा वर दि.12.04.24 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते शिवराज हामणे आणि सतिश हामणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
