भाग्यश्री सुडे च्या मारेकऱ्यांना फाशी द्या

0
भाग्यश्री सुडे च्या मारेकऱ्यांना फाशी द्या

अहमदपूर माननीय तहसीलदार मार्फत माननिय मुख्यमंत्र्यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : पुणे येथे शिक्षणासाठी राहत असलेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे हिचे अपहरण करून त तिची निघृण हत्या करण्यात आली आहे .तसेच तिचा मृतदेह जाळून पुणे नगर राज्य महामार्ग वरील सुपे परिसरात पुरून टाकण्यात आला होता . या निघृण अशा हत्तेच्या अनुषंगाने अहमदपूर येथील नागरिकांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देऊन गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन दिले आहे.

शांतताप्रिय महाराष्ट्रात ही घटना संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी वा अत्यंत भयावह असून यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे . यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे भाग्यश्रीच्या खुन्यांना त्वरित मरेपर्यंत फाशी द्यावी असे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष सरकारी वकिलाचे नियुक्ती करून फास्टट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून खटला निकाली काढावा व नराधाम गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या वेळी विनोद शिंगडे, आशिष गुणाले , अमित रेड्डी ,बापूराव गोखरे, सुशांत गुनाले, नागेश बेंबडे, अशिषभाऊ गुणाले, नवनाथ हांडे, संतोष मद्देवाड, मुडे पाटील, धिरज उगीले, कृष्णा काळे, रामनाथ पलमटे, गजानन कमठाणे , नवनाथ फुले शहरातील व्यापारी, उद्योजक व नागरिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!